प्रतिनिधी
औरंगाबाद : रस्त्यात एकटेदुकटे जाणाèया नागरिकांना अडवून लुटणाèया टोळीच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या असून, गुन्ह्यात वापरलेली टाटा मॅजिक प्रवासी व्हॅन आणि रोख साडेतीन हजार रुपयेही पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात घेतले आहेत.
शेख अजीम शेख कमरोद्दीन (२७, रा. अलमगीर कॉलनी), कलीम खान सत्तार खान (२८, रा. कटकटगेट, त्रिवेणीनगर), सय्यद इमरान सय्यद शफी (२४, रा. समतानगर), जाकेरखान महेबूब खान (२०, रा. भोईवाडा), शेख उस्मान शेख इब्राहीम (३०, रा. भोईवाडा), अशी अटक आरोपींची नावे आहेत. एका ट्रकचालकाला लुटल्यानंतर त्यांच्या पापाचा घडा भरला होता. ट्रकचालकाने पोलिसांशी संपर्क साधून लगेच माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पांढèया रंगाच्या आणि विनानंबरच्या टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा शोध सुरू केला. छावणी पुलाकडून बाबा पंपाकडे ती व्हॅन जात असल्याचे गस्तीवरील गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र गाडी थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग केला. फॉरेस्टजवळ पोलिसांनी व्हॅन अडविली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नातील आरोपींच्या मुसक्या बांधल्या.