प्रतिनिधी
वाळूज : हातउसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने संतापून एकाने सहकारी कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीत घडली. पोलिसांनी खुन्याला अटक केली आहे.
शेख गफार शेख अब्दुल रहेमान (वय २८, रा. आसेगाव) असे मृताचे नाव आहे. तो वेल्डिंगचे काम करायचा. अभिजय ऑटो प्रा. लि. कंपनीतील कामगार मंगलदास नागो सोनवणे (रा. सलामपुरेनगर, वडगाव) याने त्याचा खून केला. शेख गफार याला मंगलदासने दोन वर्षांपूर्वी घर बांधायला २० हजार रुपये हातउसने दिले होते. त्यातील काही पैसे अजूनही परत करायचे होते. वारंवार मागूनही शेख त्याला पैसे देत नव्हता. त्यामुळे मंगलदासचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. शेख झोपेत असल्याची संधी साधून मंगलदासने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर मंगलदास तेथून पळून गेला. दुसèया दिवशी सकाळी कर्मचाèयांना शेख दिसला नाही म्हणून सुरक्षारक्षकाने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा तो कॅन्टीनमध्ये मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती कंपनीचे मालक शहा यांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी शेखला घाटीत हलवले. त्याचदरम्यान मंगलदासने मालकाला फोन करून मीच खून केल्याचे सांगितले. मालकांनी ही गोष्ट पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्याला घरी जाऊन अटक केली.
वाळूज : हातउसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने संतापून एकाने सहकारी कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीत घडली. पोलिसांनी खुन्याला अटक केली आहे.
![]() |
आरोपी |