प्रतिनिधी
औरंगाबाद : येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थ जागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. पी. हयातनगरकर होते. सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. बी. बहाळकर आणि अॅड. माधुरी अदवंत - देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी अॅड. चोभे, समुपदेशक कदम, अॅड. माधुरी अदवंत - देशमुख आणि न्या. एस. बी. बहाळकर यांनी मार्गदर्शन केले. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश आय. जे. नंदा यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. कावसनकर यांनी सूत्रसंचालन केले आणि अॅड. मुळावेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुटुंब न्यायालयातील सर्व समुपदेशक, पक्षकार, वकील व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक धुळे, अमोल खोत, अधीक्षक डोंगरे आणि अनिल जाधव यांनी सहकार्य केले.