तब्बल ४५ वर्षांची परंपरा असलेला शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा सोमवारी शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर पार पडला. पण कधी नव्हे ते शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अर्थातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचंड थकल्याचे पाहून हे शिवतीर्थ गहिवरले, हेलावल्याचे चित्र काल पहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख आता ८६ वर्षांचे आहेत. वयोमानानुसार त्यांचे शरीर थकले आहे. प्रकृती साथ देत नाही. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर डॉक्टरांनी शरीराची अक्षरश: चाळणी केली असल्याने त्यांच्या फिरण्यावर, सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंधने आली आहेत. शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी या मेळाव्यास येणारे शिवसैनिक यांचे अतुट नाते आहे; पण गेल्या काही वर्षांपासून बाळासाहेबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभा घेता येत नसल्याने या मेळाव्यास उपस्थित राहणे शक्य होत नाही. असे असूनही केवळ शिवसेनाप्रमुखांचे भाषण ऐकता येईल, या अपेक्षेने हजारो शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित राहतात. पण यंदाही प्रकृती साथ देत नसल्याच्या कारणामुळेच शिवसेनाप्रमुखांना शिवतीर्थावर येऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करता आले नाही. त्यांच्याऐवजी कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचेच भाषण झाले. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत या मेळाव्यात ऐकवण्यात आली. पण या चित्रफितीच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांनी केलेले भाषण शिवसैनिकांमध्ये जान फुकणारे ठरण्याऐवजी त्यांना हेलावून टाकणारे, आपला ‘वाघङ्क खूपच थकल्याचे पाहून अस्वस्थ करणारे ठरले. अर्थात, वाघ कितीही म्हातारा झाला, तरी गवत खात नाही, या उक्तीप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी आपला आक्रमकपणा या वयातही कायम असल्याचे दाखवून दिले. सेनाप्रमुखांचा आवाज क्षीण झालेला होता. अनेक शब्द कळत नव्हते. तरी त्यांच्या भाषणात नेहमीचे आक्रमक मुद्दे होतेच. शरद पवार, सोनिया गांधी, सुशीलकुमार qशदे, कृपाशंकर qसग हे नेहमीप्रमाणेच याही वेळी त्यांचे टार्गेट ठरले. या वयातही शिवसेनाप्रमुख नित्यनियमाने वृत्तपत्रांचे वाचन करतात, देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर घडणाèया प्रत्येक राजकीय आणि सामाजिक घडामोडींची त्यांना खडा न् खडा माहिती आहे, हे त्यांच्या भाषणाच्या प्रत्येक वाक्यातून जाणवले. महाराष्ट्र सर्वभाषकांचा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अवघ्या दोनच दिवसांपूर्वी केले होते. ‘याच महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहेङ्क, हे विसरू नका, असे ठणकावत शिवसेनाप्रमुखांनी पवारांचा समाचार घेत आपण राजकीय दृष्ट्या किती जागरूक आहोत, हे स्पष्ट दाखवले. शिवाय मंत्रालयाला आग लागली, बरे झाले. भानगडी संपल्या, हे त्यांचे वाक्य शिवसेनाप्रमुखांचा मिश्किल पण बोचरी टिका करण्याचा स्वभाव कायम असल्याचे दाखवून गेला, तर लवासा प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दीड वर्ष मांडीखाली दाबून ठेवली, हे त्यांनी उपस्थितांना सांगत आपण अजूनही बारीक घडामोडींची माहिती ठेवतो, हेही दाखवून दिले. पण यावेळचे शिवसेनाप्रमुखांचे भाषण त्यांनी केलेल्या राजकीय टिकेपेक्षा त्यांच्या हताश आणि हळव्या आवाहनामुळेच अधिक चर्चेत राहणार आहे. ‘४६ वर्षे तुम्ही मला सांभाळलेत, आता उद्धव- आदित्यलाही सांभाळाङ्क, हे शिवसेनाप्रमुखांचे भावूक आवाहन खूप काही सांगून जाणारे आहे. महाराष्ट्राने शिवसेनाप्रमुखांवर भरभरून प्रेम केले, त्यांना खूप काही दिले. पण हेच प्रेम उद्धव आणि आदित्य यांनाही मिळेल की नाही, ही शिवसेनाप्रमुखांना वाटणारी शंका त्यांच्या या वाक्यावरून स्पष्ट झाली आहे. मराठी माणूस हा शिवसेनेचा प्राण आहे; पण हा प्राणच शिवसेनेपासून दुरावू लागला असल्याची जाणीवही शिवसेनाप्रमुखांना झाल्याचेही त्यांचे भाषण सांगत होते. विशेषत: ज्या दादर भागात शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेना वाढली त्याच दादरमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. हीच अवस्था राज्याच्या इतर भागांतही आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेची पिछेहाट सुरू आहे. नगरसेवक, आमदार, खासदारांची संख्या कमी होत आहे. याचे वैषम्य शिवसेनाप्रमुखांना आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची कमान हाती घेतल्यापासून त्यांना शिवसेना वाढवता तर आली नाहीच, पण आहे ती माणसे, मतदार आणि मराठी माणूसही शिवसेनेबरोबर कायम ठेवता आला नाही, हे स्पष्टच आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेचा मानला जाणारा मोठा मतदार राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळला आहे. राज्य विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आल्याने ते स्पष्टच झाले आहे. विशेषत: राज हे युवा वर्गाचे आयकॉन ठरत आहेत. तर मुंबई आणि ठाणे महापालिका पुन्हा शिवसेनेकडे कायम ठेवता आल्या, हेच आतापर्यंतचे उद्धव ठाकरे यांचे यश मानले जाते. यातूनच बाळासाहेबांना मराठी माणूस यापुढेही शिवसेना आणि पर्यायाने उद्धव आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत यापुढेही कायम राहील का?, याची शंका वाटत असावी. आणि कदाचित त्यातूनच त्यांनी शिवसैनिकांना ‘उद्धव- आदित्यलाही सांभाळाङ्क, अशी हाक दिली असावी, असेच म्हणावे लागेल. याचबरोबर त्यांनी शिवसेना सांभाळ्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आणि पर्यायाने महाराष्ट्रावर सोपवित असल्याचेही दाखवून दिले. शिवसेनाप्रमुखांच्या या आवाहनाला आता शिवसैनिक किती प्रतिसाद देतील, हे आगामी निवडणुकीतूनच स्पष्ट होऊ शकेल. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असेच शिवसेनाप्रमुखांना मनापासून वाटत असल्याचेही कालच्या त्यांच्या भाषणातून जाणवत होते. या भाषणात त्यांनी राज ठाकरेंचे नाव घेतले नाही, त्यांच्यावर प्रत्यक्ष qकवा अप्रत्यक्ष टिकाही केली नाही. पण, दादरमध्ये शिवसेनेचा पराभव का झाला, याचा विचार करा, असे सांगताच ‘मराठी माणसांनो एकत्र याङ्क, असे आवाहन करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंनाही परत फिरण्याची सादच घातल्याचे जाणवले. एकंदरीत शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना हळवा करणारा, शिवसेना सोडून गेलेल्यांना ‘या चिमण्यांनो परत फिरा रेङ्क, अशी साद घालणारा, या राज्यावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकावा, हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न दाखवून देणारा होता, असेच म्हणावे लागेल. त्याचवेळी दर दुसèया तिसèया वाक्याला मी थकलोय, प्रकृती साथ देत नाही, ही शिवसेनाप्रमुखांच्या कालच्या भाषणातील वाक्ये त्यांच्या निवृत्तीचे संकेत तर नाहीत, ना?, या अनुत्तरीत प्रश्नाने शिवसैनिकांना अस्वस्थ करून सोडले आहे, हे मात्र नक्की.