प्रतिनिधी
औरंगाबाद : अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात आधीच वीजदर जास्त आहे. असे असतानाही त्यात पुन्हा वाढ करून उद्योग देशोधडीला लावण्याचेच प्रकार सुरू आहे. यामुळे लघु व मध्यम उद्योजकांचे कंबरडेच मोडले असून, अन्य राज्यांतील उद्योजकांशी व्यवसायात स्पर्धा करणे अवघड झाले आहे, अशी तक्रार करत दरवाढीच्या निषेधार्थ मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्टड्ढीज अॅड अँग्रिकल्चर (मसिआ) तर्फे गुरुवारी दिवसभर औद्योगिक बंद पाळण्यात आला. अडीच हजार मध्यम व लघु युनिट पूर्ण बंद होते. दिवसभरात कारखाने बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे औद्योगिक नुकसान झाले. मसिआचे अध्यक्ष उदय गिरधारी यांनी सांगितले, की बंदमध्ये चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, वाळूज, चित्तेगाव आदी परिसरातील अडीच हजार युनिट बंद राहिले. दरम्यान, शुक्रवारी कारखाने बंदच असतात. त्यातल्या त्यात गुरुवारी बंद पाळल्याने कामगारांनी एकाच वेळी दोन दिवसांची सुटी मिळणार म्हणून बाहेरगावची एसटी पकडली होती.