प्रतिनिधी
पैठण : निळवंडे धरणातून जायकवाडी जलाशयात सोडलेले पाणी दाखल झाले. पण त्यामुळे जलाशयात फारसा काही फरक पडल्याचे दिसून आले नाही.
धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात २.५२५ द.ल.घ.मी. वाढ झाली. धरणात दाखल होणाèया पाण्यात वाढ होण्याची शक्यता शाखा अभियंता टी.बी. जोशी यांनी औरंगाबाद न्यूज लाइव्हशी बोलताना व्यक्त केली. काल सायंकाळी पाच वाजता धरणाची पाणी पातळी १४९५.७२ फूट तर मीटरमध्ये ४५५.८९५ एवढी झाली. धरणात एकूण जलसाठा ८०४.०७२ दलघमी झाला. धरणात जिवंत साठा ६५.९६६ दलघमी झाला असून, टक्केवारी ३.०३ टक्के एवढी झाली. धरणात सध्या ३००० क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक अजूनही सुरू आहे. ही आवक केवळ ४००० क्युसेक्स क्षमतेपर्यंत वाढेल, असे जोशी म्हणाले.