प्रतिनिधी
औरंगाबाद : भरधाव बसने प्लेझर गाडीला जबर धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. पैठण रोडवरील माँ-बाप का दग्र्याजवळ गुरुवारी सकाळी अपघात घडला.
मृतक सुषमा मनोहर नाईक (४०) घाटीत परिचारिका म्हणून काम करत होती. नाथ व्हॅली शाळेसमोरील राज व्हॅली अपार्टमेंटमध्ये ती राहत होती. ड्यूटीवर निघालेल्या सुषमावर काळाने झडप घातली. माँ-बाप का दग्र्याजवळ कामगारांची वाहतूक करणाèया बसने पाठीमागून त्यांच्या गाडीला उडवले. यात नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या कोसळल्या. रक्त मोठ्या प्रमाणावर सांडल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांची तातडीने घटनास्थळी येऊन सुषमा नाईक यांना घाटीत हलविले. मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात बसचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक पी. एल. जाधव अधिक तपास करीत आहेत.