प्रतिनिधी
औरंगाबाद : भरदिवसा चोरट्यांनी घर फोडून २३ तोळे सोन्यासह ३० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना ज्योतिनगरातील सागर प्लाझा अपार्टमेंटमध्ये घडली.
प्रेमचंद ऊर्फ प्रमोद पन्नालाल पितळे यांच्या घरी ही चोरी झाली. त्यांनी उस्मानपुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ते सागर प्लाझा अपार्टमेंटच्या चार नंबरच्या फ्लॅटमध्ये राहतात. सकाळी ११ च्या सुमारास काही सामान खरेदीसाठी ते जवाहर कॉलनीत गेले होते. याच दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलगाही कुंभारवाडा येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी डुप्लिकेट चावीच्या साह्याने घराचा दरवाजा उघडला. कपाटातील २३ तोळे सोने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केला. पितळे परत आले तेव्हा घर उघडे असल्याचे पाहून चक्रावले. धावत त्यांनी घर तपासले असता, दागिने व रोख रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.