प्रतिनिधी
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच अतितटीवर आणण्याचा निर्णय छावा मराठा युवा संघटनेने घेतला आहे. १२ जानेवारीपर्यंत सरकारने आरक्षणासंदर्भात निर्णय घेतलना नाही तर मंत्र्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशाराच संघटनाध्यक्ष प्रा. देविदास वडजे आणि प्रदेशाध्यक्ष संजय सावंत यांनी पत्रपरिषद घेऊन दिला आहे. १५ नोव्हेंबरपासून छाव्यांची ही अंतिम लढाई सुरू होणार आहे.
मराठा आरक्षणाचे घोंगडे अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. वारंवार हा निर्णय पुढे ढकलला जात आहे. त्यामुळे आता छावा मराठा युवा संघटनेने नियोजनबद्ध आंदोलन करून सरकारला जेरीस आणण्याची तयारी केली आहे. प्रा. वडजे म्हणाले की, प्रथम प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर पैठण येथून १५ नोव्हेंबर रोजी आंदोलनास सुरुवात होणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीपर्यंत सरकारने आरक्षणा संदर्भात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली जाणार आहे. किल्ले पुरंदर येथे १४ मे २०१३ रोजी अभियानाचा समारोप होणार आहे. जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संजय आळंजकर, दलित आघाडीचे संतोष संत्रे, जालिंदर येरंडे, विशाल बोबडे आदी उपस्थित होते.