शेकडो नागरिकांना चार युवकांनी धरले वेठीस
माथेफिरूंचा तपास उस्मानपुरा पोलिसांना लागेना
स्नेहा पारवार

औरंगाबाद : कॉलनीत शेकडो नागरिक असताना अवघ्या चार युवकांनी त्यांना वेठीस धरत आठ वाहनांची तोडफोड करून काही लाखांचे नुकसान केले. मनात आणले तर चारही युवकांच्या गचांड्या पकडून नागरिकांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले असते, पण दुसèयाचे जळतेय आपल्याला काय, असे म्हणण्याची वृत्ती किती प्रत्येकाच्या डोक्यात भिनली आहे, याचेच प्रत्यंतर म्हाडा कॉलनीतील घटनेने सर्वांना पुन्हा करून दिली आहे. मराठवाड्याचे सळसळते रक्त इतके थंड आणि स्वार्थी बनले, याचेच आज सर्वांना आश्चर्य वाटू लागले आहे. ज्या साई गायकवाडमुळे म्हाडा कॉलनीत चार तरुणांनी यथेच्छ धुडगूस घातला, त्या साईची अशी कोणती दुश्मनी त्या तरुणांसोबत होती, हे लक्षात घेतले तर आणखी आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहावत नाही. साई घरमालकाच्या मुलीला या गुंडांच्या त्रासापासून मुक्त करत होता, म्हणून गुंडांनी हा गोंधळ घातलेला!
साई गायकवाड कुटुंबासह जवाहरनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. तेव्हा तेथील घरमालकाच्या भाचीला काही गुंड तरुण मोबाईलवरून त्रास देत होते. घरमालकाने साईला यात लक्ष घालण्याची विनंती केली म्हणून साईने त्याला गुंडांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा चांगुलपणा त्यालाच नडला आणि गुंडांशीच त्याचे वैर झाले. गुंड त्याला घरात जाऊन मारणार होते. पण साई गुंड आले तेव्हा गायब होता म्हणून वाचला. गुंड ना साईला ओळखत ना साई त्यांना ओळखत केवळ मोबाईलवर त्यांचे इतके टोकाचे वैरत्व वाढलेले आहे. साईने मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पण आता तोच मोठ्या अडचणीत सापडला आहे. यावरून कुणी यापुढे दुसèयाच्या मदतीला धावेल का, यात शंकाच आहे. वास्तविक घरमालकाला पोलिसांकडे जाण्याचा पर्याय होता, त्यातून पोलिसांनी काही मार्गही काढला असता, पण साईला त्यात गोवून त्यांनी स्वतः नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केला, असेही या घटनेबद्दल म्हणता येईल. म्हाडा कॉलनीत साईच्या शोधार्थ आलेल्या तरुणांनी बèयाच जणांना त्याचा पत्ता विचारला; पण कोणीही त्यांना तो कुठे राहतो, हे सांगितले नाही, एवढी तरी माणुसकी सर्वांनी दाखवली हे बरे झाले. पण त्यानंतर चार तरुणांनी जेव्हा गोंधळ सुरू केला, तेव्हा त्यांना धडा शिकवणे कॉलनीतील नागरिकांना असे किती अवघड होते, हाही प्रश्नच येतोच ना. असेच कुणी मुठभर लोक कॉलनीत येऊन गोंधळ घालत असतील आणि नागरिक षंढासारखे केवळ पाहत उभे राहतील तर पुढे शहराचे काय होणार आहे, देवच जाणोत.
घटनेनंतर पोलिसांनी काय केले?
पोलिसांनी अगोदर साईचा शोध घेतला. तेव्हा तो हैदराबादकडे निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. उस्मानपुरा पोलिसांनी साईचा फोटो व मोबाईल नंबर देऊन नांदेड पोलिसांना त्यास ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानुसार नांदेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणले. पोलिसांनी त्याच्याकडे माथेफिरूंबाबत विचारणा केली. तेव्हा संपूर्ण प्रकरणाचा उगलडा झाला. मात्र आता पोलिसांसमोर या माथेफिरूंना शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.