Home » , , , » राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा; आर्थिक दुर्बलांच्या सवलती वाढविणार : शरद पवार

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा; आर्थिक दुर्बलांच्या सवलती वाढविणार : शरद पवार

Written By Aurangabadlive on रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२ | ११:०५ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर मुलींना त्यांचा हक्क मिळवून द्यावा लागेल. तसेच उपेक्षीत समाजातील मुला, मुलींना आरक्षण मिळाले पाहीजे, त्यात मतभेद असण्याचे कारण नाही. पण उपेक्षीत समाजातील मुलां, मुलींना जशा सवलती मिळतात, तशाच गरीब मुला, मुलींना सवलती मिळाल्या पाहीजेत, असे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा आज देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपस्थित युवतींना मार्गदर्शन करताना केंद्रीय कृषीमंत्री पवार बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगण भुजबळ, खा. तोरक अन्वर, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राज्यमंत्री गुलाबराव देवकर, आरोग्यमंत्री विजयकुमार गावीत यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. केंद्रीय कृषीमंत्री पवार म्हणाले, देशाचा इतिहास पाहता स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोन फार चांगला नाही. आपल्या देशात धार्मिक नेते, मानवतावादी विचार देणारे होवून गेले. त्यांनी पत्नी त्याग केला. यातून त्यांना दृष्टीकोन समजतो मात्र सीतेचे अपहरन झाल्यानंतर तिची सुटका हनुमानाने केली. मग ती काही काळ रामपासून दुर राहीली असल्यामुळे तिला अग्नी परिक्षा द्यावी लागल्याचे सांगीतले जाते. त्यावेळी रामाला का अग्नीपरीक्षा घ्यावी वाटली आणि सितेच्या कुटूबियांनी किंवा अयोध्यावासियांनी त्यास का विरोध केला नाही, असा प्रश्न पडतो. याचाच अर्थ स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकाने बदलायला हवा. त्यासाठी स्त्री जागृत झाली पाहीजे. स्त्रीयांवर अनेक प्रकारचा अत्याचार केला जातोय, त्याबाबत याठिकाणी काही मुलींनी भावनाही व्यक्त केल्यात. स्त्री वरील अत्याचार रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कायदा पुरेसा नाही. हे प्रश्न केवळ कायद्याने सुटणार नाहीत. ते सोडविण्यासाठी सामुदायिक शक्ती दाखविण्याची गरज आहे. एकदा काय वेळेच्या वेळी अन्याय करणाèयास त्याची जागा दाखविल्यास तो पुन्हा त्या वाटेला जाण्याचे धाडस दाखवणार नाही. आदिवासी समाजामध्ये मुलींकडून हुंडा न घेता उलट मुलांलाच द्यावा लागतो. हे प्रगत समाजाला कळायला अजुनही वेळ लागतो. यावरुन कळते की, कोण मागास आहे. कोण सामाजिकदृष्ट्या असा टोलाहि त्यांनी लगावला. समाज परिवर्तनाच्या या लढ्यात युवतींनी मोठ्या संख्येनी एकत्र यावं, स्त्रीयांच्या प्रश्नावर जागृती करायची आहे. मुलींचे मन तयार करायचे आहे. तिची आत्मशक्ती वाढवायची आहे. त्याशिवाय परिवर्तन होणार नाही. हा प्रयत्न मतसाठी नाही. तर स्त्रीला सन्मानाची वागणुक देण्याचा प्रयत्न आहे. स्त्रीच्या कर्तृत्वातून नव्या राष्ट्राची उभारणी होवू शकते. मोठ्या परिश्रमाने हे संघटन उभे राहीले आहे. सामाजिक प्रश्नाची सोडवणूक करण्याचे काम करा, यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाèयांनी मदत करावी. तसेच मेळाव्यात एका मुलीने आर्थिक मागस असलेल्यांना आरक्षण मिळायला हवे, असे मत व्यक्त केले होते. हा धागा पकडून पवार म्हणाले, आर्थिक मागास असलेल्यानाही सवलती मिळाल्या पाहीजेत. हे शंभर टक्के खरे आहे. मी राज्याचा प्रमुख असताना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यानंतर त्यात सुधारणा झाल्याचे दिसत नाही. या विभागात काम करणाèयांना विश्वासात घेवून गरीब मुलां मुलींना त्यांच्या दारिद्रयामुळे शिक्षण घेता येत नाही, ही स्थिती महाराष्ट्रात राहणार नाही. त्या दिशेने पाऊले टाकली जातील. शिक्षण घेण्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतील त्या खा, मात्र ज्ञान संपादन करा,त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. ज्या दिवशी तुम्ही ज्ञानी व्हाल, त्यावेळी तुम्ही लक्ष्मीचे पुजक व्हाल, ज्ञानाच्या माध्यमातून लक्षी तुमच्या घरामध्ये येईल. जर समाजामध्ये कुठे अत्याचार होत असेल तर दुर्गेचेही पुजन करा. म्हणजे कुणीही तुमच्या नादी लागणार नाही. त्यासाठी सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गाचे अखंड स्मरण करा, म्हणजे व्यक्तिगत आणि वैयक्तीक जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, युवती स्वतःच्या पायावर उभ्या राहील्या पाहीजे, तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांचेही विचार पुढे घेवून जाता येईल, त्यासाठी हा प्रयत्न आहे. आजच्या युवतींच्या उपस्थितींने दाखवून दिले की, हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मुलींच्या प्रश्नाबाबत जागरुकता निर्माण करुन ते सोडविण्यासाठी युवतींचे मोठे संघटन राज्यात उभे करायचे आहे. या प्रयत्नाला सर्व भागात मोठे यश मिळत आहे. यावेळी खा. सुळे यांनी राज्यात महिला, युवती सुरक्षित नसल्याचे सांगून गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पोलिसांना सुचना करण्यास सांगीतले. तसेच काही मुलींनी हुंडा मागणाèयांना कठोर शिक्षा तसेच नव्याने कठोर कायदा करण्याची मागणी केली. त्यावर हुंडा मागणाèयांची वरात पोलिस ठाण्यात घेवून जाण्यास सांगीतले. मात्र, त्याच वेळी एका मुलीने पोलिस असलेला नवरदेवच हुंडा मागत असेल तर, असा प्रश्न उपस्थित करुन पाटील यांना विचार करण्यास भाग पाडले. त्यावर अशा पोलिसांचे प्रकरण आपल्याकडे द्यावे, असे पाटील यांनी सांगीतले. यावेळी काही प्रश्नांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनीही उत्तेरे दिली. मेळाव्यात ८ युवतींना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. या मुलींनी
आपल्यासह परिसरात येणाèया अडचणी कथन केल्या. सकाळी दहा वाजेपासून व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.