ओलें मूळ भेदी खडकांचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धि
नव्हे ऐसें काही नाही अवघड, नाही कईवाड तोच वरि
दोरें चिरा कापे पडिला कांचणी, अभ्यासें सेवनी विष पडे
तुका म्हणे कैंचा बसण्याशी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी
- संत तुकाराम
जिवंत झाडाचं मूळ जसं जसं वाढत जातं, ते लवचिक आणि विशेष म्हणजे नरम असूनही खडकाला फोडून फोडून जमिनीत घुसत असतं. अशा पद्धतीनं प्रयत्नांच्या जोरावर सगळ्याच गोष्टी शक्य करून दाखवता येतात. प्रयत्न केले पण एखादी गोष्ट शक्य झालीच नाही असं कधीच होत नसतं. प्रत्येक गोष्ट प्रयत्न केले की, शक्य होतच असते. पण त्यासाठी प्रयत्न करण्याचा ठाम निश्चय आवश्यक आहे. सतत दोरी घासल्यानं दगड सुद्धा कापला जातो आणि सवयीनं माणूस विष सुद्धा पचवू शकतो. एवढंच काय तर आईच्या पोटात नऊ महिन्यांचं मुल राहू शकतं, एवढी जागा तरी असते काय? पण हळूहळू ते मूल राहण्याइतकी जागा पोटात थोडी थोडी वाढत जाते.
लेखक संपर्क : मो. ९४२२२०७६९४