कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट, यावर आतापर्यंत अनेकदा संशोधन झाले आहे. काही वेळा कॉफी आरोग्यासाठी चांगली ठरली आहे तर काही वेळा वाईट. आता एका नव्या संशोधनात कॉफीचा एक वाईट परिणाम समोर आला असून, महिलांच्या वांझपणाला संशोधकांनी कॉफीला जबाबदार ठरवले आहे. दिवसातून चार कपहून अधिक कॉफी पिली तर महिलांना आई होण्यात अडचण निर्माण होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. याउलट कमी प्रमाणात कॉफी पिणे हृदयासाठी चांगले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कॉफी केवळ महिलांसाठीच नुकसानकारक असून, पुरूषांवर कॉफीचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. कॉफीत आढळून आलेले कॅफीन तत्त्व महिलांच्या गर्भधारणेत अडचण आणू शकतात. त्यामुळे जास्त कॉफी पिणाèया महिला आई बनण्यापासून वंचित राहतात. दिवसातून चार qकवा त्यापेक्षा जास्त कॉफी पिणाèया महिलांना कायमस्वरूपी वांझपणालाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कॉफी पिणे महिलांनी बंद करणेच हिताचे राहील, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. अनेक महिलांना कॉफी पिल्याशिवाय चैन पडत नाही. चहा ऐवजी त्या कॉफी पिणेच योग्य समजतात. त्या या संशोधनामुळे सावध होतील, अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे.