शरीर आकर्षक बनविण्यासाठी महिला काय काय नाही करत..? तास न् तास जिममध्ये कसरत करतात, खाण्या-पिण्यावर बंधने आणतात, रोज सकाळी उठून जॉगिंगला जातात... आणि बरंच काही काही करतात... पण आता या सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि शास्त्रज्ञांनी सूचवलेला नवीन पर्याय अंमलात आणा. रोज दोन ग्लास दूध पिल्याने वजन घटवले जाऊन शरीर आकर्षक बनते, असे संशोधकांनी आपल्या नव्या शोधात म्हटले आहे! इस्त्रायल येथील नेगेवच्या बेन गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तमाम महिला वर्गाला दिलासा देणारे संशोधन केले केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दूधाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करता येते. संशोधनात त्यांनी शंभर महिलांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. यातील पन्नास महिलांना रोज दोन ग्लास दूध प्यायला लावले तर पन्नास महिलांना दुधाचा थेंबही दिला नाही. सहा महिन्यांत दूध पिणाèया महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डी वाढल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर नंतरच्या काळात दोन वर्षांत त्यांनी सहा किलो वजन घटवले होते. यातुलनेत दूध न पिणाèया महिलांचे वजन मात्र कायम वाढतच राहिले आणि दोन वर्षांत त्यांचे वजन आणखी वाढल्याचे दिसून आले. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननेही या संशोधनाला मान्यता दिली.
