मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी एकजूट, गंभीर परिणामांचा इशारा
प्रतिनिधी
औरंगाबाद : मराठवाड्याची पाणी समस्या सोडविण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी मिqटग बोलाविली होती. मराठवाड्यातील एकूण ५६ आमदारांपैकी पुरे डझनभरही आमदार बैठकीला आले नाहीत. अर्थात, संख्येवर आंदोलनाची आक्रमकता ठरत नाही तर त्यासाठी उत्साह आणि मनात जिद्द हवी, हेच पुन्हा या बैठकीतून दिसून आले. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी काहीही करू, असा निर्णय सर्व आमदारांनी या बैठकीत घेतला. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून बुधवारी मुख्यमंत्री व राज्यपालांची भेट घेण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला निमंत्रण आ. प्रशांत बंब, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, आ. मीरा रेंगे (पाथ्री), आ. संतोष सांबरे (बदनापूर), आ. सुरेश जेथलिया (परतूर,) काँग्रेसचे आ. डॉ. कल्याण काळे (फुलंब्री), आ. कैलास गोरंट्याल (जालना), राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित (गेवराई), आ. चंद्रकांत दानवे (भोकरदन), मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील आ. सतीश चव्हाण उपस्थित होते.
कोण काय म्हणाले?
आ. प्रशांत बंब
ऊध्र्व गोदावरी खोèयात ११५ टीएमसी व निम्न गोदावरी (म्हणजे जायकवाडीपासून खाली) खोèयात १०२ टीएमसी पाणी वाटप झाले आहे. परंतु वरच्या भागात १५८ टीएमसी क्षमतेची धरणे बांधण्यात आली. सध्या त्या धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम-२००५ नुसार दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी पाण्याचे समन्यायी वाटप होणे आवश्यक आहे. या नियमानुसार जायकवाडीमध्ये ३३.२० टीएमसी पाणी येणे आवश्यक आहे. आमच्या हक्काचे पाणी मिळाल्यानंतर त्यातील पिण्याला, खरीप किंवा रबीला कसे द्यायचे ते आम्ही ठरवू.
आ. अमरसिंह पंडित
नाशिक, नगरकरांचा हावरटपणा वाढत आहे. भर पावसाळ्यात त्यांनी कालव्यातून पाणी सोडून विहिरी, शेततळे, चाèया भरून घेतल्या. आता २.५ टीएमसी पाणी सोडले. त्यातही अनेकांनी विहिरी भरल्या. फक्त ०.८० टीएमसी पाणी जायकवाडीपर्यंत पोहचले. आमच्या भागात पडणारे पाणी आमचे, अशी त्यांची भूमिका असेल तर परळीत तयार होणारी वीज फक्त मराठवाड्यानेच वापरावी काय?
कैलास गोरंट्याल
आम्ही आमच्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र आलो आहोत. वेळ पडली तर तीव्र आंदोलनही करू. त्यासाठी सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवू.
सुरेश जेथलिया
वरून पाणी सोडण्यास जेवढा विलंब होईल, तेवढे नुकसान अधिक होणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही लावून धरू.
आ. चंद्रकांत दानवे
नुकतेच पाणी सोडल्याने खोरे ओले आहे. ते सुकण्यापूर्वी पाणी सोडा, अन्यथा पाणी सोडूनही काहीही फायदा होणार नाही. सोडलेल्या २.५ टीएमसी पाण्यापैकी केवळ ०.८० टीएमसी पाणी जायकवाडीत आले. म्हणजेच ७५ टक्के पाणी वाया गेले आहे.