लाखाचे पिस्तूल, जीवंत काडतुसे विकणारा तरुण वैजापुरात अटक
प्रतिनिधी
वैजापूर : १ लाख रुपये किंमतीचे इंडियन मेड पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे अवैधरित्या विकण्यास आलेल्या सुनील पवार या तरुणाच्या वैजापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंदुकीची अवैध विक्री होत असल्याचे आतापर्यंत सर्वांना माहीत होते, पण आता नगरमधून हे बंदुकी विक्रीचे लोण आसपासच्या जिल्ह्यातही पोहचू लागले आहे, हे यावरून घटनेवरून दिसून येत आहे.
शिर्डीचा रहिवासी सुनील पवार हा पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच खबèयाने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. सुनील वैजापूर-कोपरगाव रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ आला असता पोलीस निरीक्षक आनंद पाटील, फौजदार संभाजी पवार, अर्चना पाटील, प्रशिक्षणार्थी फौजदार श्रीनिवास भिकाने, हवालदार सीताराम घुगे, नंदकुमार नरोटे, मनोज घोडके, एस.बी. पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अनंत जोशी, नीळकंठ देवरे, रविकिरण भारती, जीवन पाटील, दीपक सुरोशे यांच्या पथकाने सुनील पवारवर झडप घातली. त्यामुळे गोंधळून जाऊन सुनील पळू लागला. पण पळण्याची संधीच पोलिसांनी त्याला दिली नाही. अवैध शस्त्र विक्रीमागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नगर जिल्ह्यात अनेकांकडे अशा प्रकारच्या बंदुकी असतात. त्या बंदुकीच्या धाकावर ते इतरांना धमकावत असतात. इतरांना धाकात ठेवण्यासाठी या बंदुकांचा सर्रास वापर होतो. पण यामुळे एखादी अनुचित घटनाही घडू शकते, याचे गांभीर्य पोलिसांना नसते. त्यामुळे बंदूक बाळगणाèयांच्या विरोधात एखादी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षात सामान्यांकडून होत आली आहे. आता नगरचे हे लोण आजूबाजूच्या जिल्ह्यातही पसरू लागल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.