प्रतिनिधी
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेचा आता विस्तार झाला आहे. तब्बल २२९ पदाधिकाèयांची जंबो शहर कार्यकारिणी नव्याने घोषित करण्यात आली. शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष विनोद पाटील, कोषाध्यक्ष अभिजित देशमुख, प्रसिद्धीप्रमुख अवधूत शिंदे यांची पदे एकाकी असून या कार्यकारिणीत ३३ उपाध्यक्ष, ३८ सरचिटणीस, ५३ चिटणीस, ३२ सहचिटणीस, २८ सल्लागार, ३९ विशेष निमंत्रित, अशा २२९ पदाधिकाèयांचा समावेश आहे. यासह औरंगाबाद, पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारिणीही घोषित करण्यात आल्या आहेत. तिन्ही कार्यकारिणींत प्रत्येकी ३९ पदाधिकाèयांचा समावेश आहे.