निनावी पत्राद्वारे कार्यालय उडविण्याची धमकी
औरंगाबाद : मुस्लिम तरुणांना जाणुनबुजून वेगवेगळ्या अतिरेकी हल्ल्यांत गुंतवून एटीएस त्यांना छळत असल्याचा आरोप करून, हे थांबवले नाही तर औरंगाबाद येथील एटीएसचे कार्यालय उडवून दिले जाईल, अशी धमकी एका निनावी पत्राने औरंगाबादच्या एटीएस विभागाला मिळाले आहे. अतिरेक्यांचे माहेरघर बनलेल्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर एटीएसने केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी विचारसरणी जपलेले लोक बिथरले आहेत. त्यामुळेच त्यांनी या निनावी पत्राद्वारे एटीएसला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. मात्र यामुळे आता एटीएसच्याच कार्यालयाला जपावे लागणार असल्याचा मोठा पेच एटीएसच्या अधिकाèयांना पडला आहे. नांदेडमधून गेल्या महिन्यात इंडियन मुजाहिदीनच्या चार संशयितांना अटक करण्यात आली. पाठोपाठ पुणे बाँबस्फोट प्रकरणात औरंगाबाद व नांदेडच्या दोघांना दिल्लीत अटक करण्यात आली. हा तपास सुरूच आहे तो ही धमकी मिळाली आहे. पत्रामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. या कार्यालयाला वाढीव पोलिस बंदोबस्तही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.