नागेबाबा बँकेतून चोरीस गेलेले दीड किलो सोने, पाच लाख रुपये रोख जप्त
प्रतिनिधी
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील संत नागेबाबा मल्टीस्टेट बँकेत झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपी गोरख विठ्ठल लोखंडे, मच्छिंद्र विठ्ठल लोखंडे या दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दीड किलो सोने, ५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक इशू सिंधु यांनी पत्रपरिषदेत दिली.
पैठण तालुक्यात ३० सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन दिवशी संत नागेबाबा सोसायटीत आरोपी गोरख विठ्ठल लोखंडे (२५) आणि मच्छिंद्र विठ्ठल लोखंडे (२२) या भावांनी बँकेत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. अधिक माहिती देताना सिंधु म्हणाले की, दोन्ही आरोपी व्यवसायाने मिस्त्रीचे काम करीत असून त्यांचे खाते संत नागेबाबा सोसायटीत आहे. एकदा बँक मॅनेजर यांनी आरोपींच्या समोर बँकेचे लॉकर्स उघडले होते. त्यावेळी आरोपींना मध्ये मोठी खोली असल्याचे दिसून आले. त्यानंतर ३० सप्टेंबरच्या रात्री ९.३० वा. दोघांनी लॉकर्सच्या रुमवरील छताला छिद्र पाडून चोरी केली. यात ७५ लाखांची चोरी झाल्याचे पैठण पोलिसांनी नोंद केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी एटीएस पोलिसांच्या खबèयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पैठण येथे पंधरा दिवसांपासून दोघांवर लक्ष ठेवून होते. चोरी केलेले सोने व्यापाèयांना विकून पैसे घेत होते. तसेच मिस्त्रीचे काम करण्यासाठी रोज जात होते. परंतु कोणतेही नवीन काम ते घेत नव्हते. दरम्यान, औरंगाबादला सोने विकण्यासाठी येणार असल्याचे समजातच पोलिसांनी पैठण बिडकीन कवडगाव जवळ एमएच २०- बी.जी.- ५५४४ सिडी डॉन या दुचाकीवरून येताना अडविले. त्यांची विचारपूस केली असता आरोपींनी चोरी केलेले सोने असल्याचे सांगून घरात बँकेतील चोरीचे सोने असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पैठण येथील राहत्या घरातून ५ किलो २७३ ग्रॅम सोन्यापैकी दीड किलो सोने जप्त केले तर चोरी केलेल्या सोन्यातून मिळालेली ५ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. चोरी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कुठेही गुन्हे दाखल झालेले नसून पहिल्यांदाच चोरी केल्याचे समोर आले आहे. उर्वरित सोने व्यापाèयांना विकले असल्याने त्यांच्याकडून घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.