आठ वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, पोलिस युवकांच्या शोधात
प्रतिनिधी
औरंगाबाद : माथेफिरू युवकांच्या टोळक्यांनी मद्यधुंद अवस्थेत ज्योतिनगर परिसरातील म्हाडा कॉलनीत गोंधळ घातला. शिविगाळ करत जोरजोरात ओरडत त्यांनी रस्त्यावरील उभ्या वाहनांवर दगडं घातली. त्यात तीन चारचाकी, ३ तीनचाकी आणि दोन दुचाकींच्या काचा फुटल्या. त्यामुळे नागरिकांत एकच दहशत पसरली. उस्मानपुरा पोलिस या युवकांचा शोध घेत आहेत.
मध्यरात्री एकच्या सुमारास दोन मोटारसायकलींवर चार तरुण साई गायकवाड या तरुणाचा शोध घेत म्हाडा कॉलनीत आले होते. महानायक दैनिकाच्या कार्यालयात त्यातील एक जण गेला व त्याने दैनिकाचे संपादक बाबा गाडे यांना त्याचा पत्ता विचारला. बाबा गाडे यांनी या ओळखत नसल्याचे सांगून जाण्यास सांगितले. त्यावरून त्याने बाबा गाडेंशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. नंतर तो तरुण तिथून बाहेर निघून गेला. पण नंतर तो परत आला आणि पुन्हा हुज्जत घालू लागला. त्यामुळे बाबांचे चिरंजीव चेतन गाडे यांनी त्याला दम भरला व बाहेर काढले. त्यानंतर अॅड. प्रवीण वाघमारे हे शहानूरमियाँ दर्गा चौकातून विभागीय क्रीडा संकुलमार्गे जात असताना त्या चौघांनी पाठलाग करून वाघमारे यांना अडवले व त्यांच्याशी धक्काबुक्की केली. ही बाब त्यांनी गाडे यांना मोबाईलवरून कळवल्याने ते घटनास्थळाकडे तात्काळ निघाले. तेथे जाण्यापूर्वीच चौघेही परत म्हाडा कॉलनीत आले व त्यांनी वसीम सलीम सय्यद यांच्या मालकीची तवेरा (एमएच-२६, टी-४४४४), अय्युब खान यांची इंडिगो (एमएच-२१, जी- ३९५०), रावसाहेब जाधव यांची इंडिगा (एमएच-२०- एवाय-४७५६), अलिमोद्दीन शेख यांची रिक्षा (एमएच-२०, एए-२१८३), अकबर शेख यांची रिक्षा (एमएच-२०, एएफ-१९५९), अभिमन्यू सुरासे यांची मालवाहू रिक्षा (एमएच-२०, एटी-४०२९), चेतन गाडे यांची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-२०, सीके-३००९) व शलाका गाडे यांची मोपेड (एमएच २०, बीके- ६६२२), अशा एकूण ८ वाहनांवर दगडफेक करून त्यांची तोडफोड केली. ही घटना उस्मानपुरा पोलिसांना कळविल्यानंतर सकाळी ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाèयांनी घटनास्थळी भेट देऊन वाहनांची पाहणी केली. साई गायकवाड हा तरुण याच परिसरात राहतो. त्याला या घटनेविषयी कळताच तो सकाळीच फरार झाला. नुकसान झालेल्या चारचाकी व तीनचाकी वाहनांपैकी अनेकजण त्या वाहनांचे नुसते चालक आहेत. त्यामुळे मालकांना काय तोंड द्यायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. नुकसानभरपाई त्या युवकांकडून वसूल करून आम्हाला द्यावी, अशी मागणी हे वाहनचालक पोलिसांकडे करणार आहेत.