हायलाईट्स
औरंगाबाद तालुका : लाडसावंगी, गोलटगाव, गांधेली ग्रामपंचायतीत भाजपाची पिछेहाट. दौलताबाद ग्रामपंचायतीवर घड्याळाची टिकटिक सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व. सातारा ग्रामपंचायतीत पुन्हा काँग्रेस.
गंगापूर तालुका : काँग्रेस व शिवसेनेला सर्वाधिक जागा.
पैठण तालुका : २१ पैकी १५ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला.
वैजापूर तालुका : २५ ग्रामपंचायतीत संमिश्र निकाल.
फुलंब्री तालुका : प्रस्थापित धक्का देणाèया ग्रामपंचायती पाथ्री, पीरबावडा, खामगाव नाथाचे.
सोयगाव तालुका : ५ ग्रामपंचायतींचा संमिश्र निकाल.
सिल्लोड तालुका : १८ पैकी १२ ग्रामपंचायती काँग्रेसच्या हातात.
खुलताबाद तालुका : दहा ग्रामपंचायतीत प्रस्थापित दे धक्का.
स्नेहा पारवार : औरंगाबाद तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. काँग्रेसच्या ताब्यातील दौलताबाद ग्रामपंचायतीवर घड्याळाची टिकटिक सुरू झाली असून, लाडसावंगी, गोलटगाव, गांधेली ग्रामपंचायतीवर काँग्रेस, राकाँने विजय झाल्याचे म्हटले आहे. सातारा ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे काँग्रेसचीच राहिली. फिरोज पटेल यांनी ग्रामपंचायत काँग्रेसच्याच हाती ठेवण्यात यश मिळवले.
शमीम शेख : गंगापूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीत सर्वाधिक जागा काँग्रेस व शिवसेनेने काबीज केल्या. बहुतांश ठिकाणी नवख्यांनी प्रस्थापितांना धूळ चारल्याचे दिसून आले आहे.
साईनाथ कुलकर्णी : कन्नड तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. पण खामगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होतकी. त्यामुळे ४८ ठिकाणीच रणधुमाळी रंगली. निवडणुकीत ५४ जण बिनविरोध आले. ३९५ पैकी २२१ महिला निवडून आल्याने कन्नडमध्ये महिलाराज अवतरले आहे. बहिरगावात फक्त दोन जागांसाठी निवडणूक झाली. इतर जागा यापूर्वीच बिनविरोध आल्या होत्या.
जगदीश भांडे : पैठण शिवसेनेचीच हे ब्रिद पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या निकालाने खरे ठरवले आहे. २१ पैकी तब्बल १५ ग्रामपंचायतींवर सेनेचा झेंडा फडकला. सर्वांत मोठी असलेली बिडकीन ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात आघाडीला यश आले. कृष्णापूर ग्रामपंचायत बिनविरोध झाली.
रफीक पठाण : वैजापूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिवसेनेला हादरे बसले आहेत. २५ ग्रामपंचायतींचे संमिश्र निकाल हाती आले असून, महालगाव, कणकसागज, तिडी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
धनंजय कुलथे : फुलंब्री तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची निवडणूक या वेळी नवखे आणि प्रतिष्ठीत यांच्यातच झाली. पाथ्री, पीरबावडा, खामगाव नाथाचे येथील निवडणुकीत प्रस्थापितांना धुळ चारली गेली. पाथ्रीत राकाँने बाजी मारली, पीरबावड्यात पं.स. उपसभापती डॉ. सारंग गाडेकर यांचे पॅनल हवेत उडाले. भाजपा-सेना-मनसे-काँग्रेस असे संयुक्त पॅनल येथे सत्ता गाजवणार आहे. खामगाव नाथाचे येथे शिवसेनला बहुमत मिळाले.
चंपालाल देसाई : सोयगाव तालुक्यातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाèया फर्दापूरच्या ग्रामपंचायतीत एका जागेची पोटनिवडणूक झाली. तेथे भाजपाला यश मिळाले आहे. ५ ग्रामपंचायतींचे संमिश्र निकाल हाती आले.
डी. एन. जाधव : सिल्लोड तालुक्यातील १८ पैकी १२ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने ताबा मिळविल्याचा दावा तालुकाध्यक्ष गणेशराव दौड यांनी औरंगाबाद न्यूज लाइव्हशी बोलताना केला.
दयानंद कोठारी : खुलताबाद तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नवख्यांनी प्रस्थापितांना दे धक्का दिला आहे. शूलिभंजन येथे माजी सरपंच अशरफ अली यांनी मात्र ग्रामपंचायत हातची जाऊ दिली नाही. वीरमगावलाही विठ्ठलराव आधाने यांना पुन्हा सत्तेची चावी मतदारांनी हाती दिली. चिंचोलीत माजी सभापती हिरालाल राजपूत यांनी पंचायत ताब्यात घेतली.