लठ्ठपणामुळे केवळ महिलांच्या शरीराचेच नुकसान होते असे नाही तर होणाèया अपत्यालाही त्यांच्या लठ्ठपणाचा फटका बसतो. लठ्ठ महिलांचा गर्भपात होण्याची भीती सामान्य महिलांच्या तुलनेत जास्त असते, असा धोक्याचा इशारा ब्रिटन येथील न्यूकॅसल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
सुमारे ४० हजार गर्भवती महिलांवर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भात डेली मेल या ब्रिटिश दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे, की ज्या महिलांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३० हून अधिक होता, त्यांच्यात गर्भपात होण्याची शक्यता १. ६ टक्के होती. तर सामान्य महिलांमध्ये हे प्रमाण ०. ९ टक्के होते. प्रत्यक्ष परिणामही या निष्कर्षाप्रमाणेच दिसून आले. १ हजार लठ्ठ महिलांपैकी १६ जणींनी आपले मूल गमावले होते तर सामान्य महिलांमध्ये हजारातील केवळ ९ जणींनाच या संकटाला तोंड द्यावे लागले. संशोधनात म्हटले आहे, की गर्भावस्थेआधी महिलांनी आरोग्यासाठी चांगले असलेले वजन प्राप्त केले पाहिजे आणि गर्भावस्थेत डाएqटग टाळायला हवे. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख डॉ. रूथ बेल यांनी सांगितले, की संशोधनात समोर आलेले परिणाम पूर्णपणे अनपेक्षित नाहीत. यापूर्वीही झालेल्या संशोधनात असेच निष्कर्ष बाहेर आले आहेत. पण आता महिलांनी या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.