संशोधकांनी प्रथमच स्तन कॅन्सरला जबाबदार असलेला जीन शोधून काढला असून, ओनकोजीन नावाचा हा जीन आक्रमक असतो तेव्हा स्तन कॅन्सरच्या विकासात मुख्य भूमिका निभावतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या जीनचा शोध युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज आणि ब्रिटिश कोलंबिया कॅन्सर एजन्सीच्या संशोधकांनी लावला. तब्बल पाच वर्षे हे संशोधन चालले. संशोधकांनी सांगितले, की जेव्हा हा जीन सक्रीय होतो तेव्हा स्तन कॅन्सरशी संबंधित ट्यूमर विकसित व्हायला सुरुवात होते. हे संशोधन एक महत्त्वपूर्ण यश असून, यामुळे स्तन कॅन्सरवर उपचारात नवी दिशा मिळाली आहे. या जीनवर निशाणा साधण्यासाठी त्याला अटकाव करणारी औषधी निर्माण करता येणार आहे. आतापर्यंत या जीनचा शोध लागला नव्हता. त्याला शोधल्यानंतर असे जाणवले आहे की स्तन कॅन्सरला मुख्य कारण हाच जीन आहे. संशोधनासाठी प्रमुख संशोधक कार्लोस काल्डास आणि त्यांच्या सहकाèयांनी मायक्रोरे तंत्रज्ञानाचा वापर केला. स्तन कॅन्सरला जबाबदार एकूण ११७२ ट्यूमरचा संशोधनात अभ्यास करण्यात आला. त्या सर्वांमध्ये या जीनचा सहभाग मुख्यरित्या आढळून आला. याआधी संशोधकांनी २० वर्षांपूर्वी स्तन कॅन्सरला जबाबदार पहिल्या डीएनएचा शोध लावला होता. पण या नव्या संशोधनाने संशोधक खèया अर्थाने वास्तविक तथ्यापर्यंत पोहचले आहेत.
Home »
» स्तन कॅन्सरला जबाबदार जीनचा शोध
स्तन कॅन्सरला जबाबदार जीनचा शोध
Written By Aurangabadlive on मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२ | १:४२ PM