प्रतिनिधी
वाळूज : केवळ दूरध्वनीवर बोलत होता, म्हणून कार्यकत्र्याला शिविगाळ करणाèया पोलिसाला निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या कार्यकत्र्याने नंतर घरी जाऊन नंतर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. खोजेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हा प्रकार घडला होता.
२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खोजेवाडीत आपल्या उमेदवाराला मदत करण्यासाठी शेख महंमद शेख नसरोद्दीन (३२, रा. खोजेवाडी) हजर होता. पोलिसांकडील नोंदीनुसार जिल्हा परिषद मतदान केंद्रावर शेख महंमद तो मोठ्या आवाजात बोलत होता. त्याला रोखण्यासाठी गेलेले पोलिस उपनिरीक्षक सुरेश खाडे यांच्याशी शेख महंमद याने वाद घातला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. काही वेळातच शेखने त्याच्या घरी जाऊन विष घेतले. हा प्रकार समजताच त्याला घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १०३ मध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दशरथ चौधरी करीत आहेत.