प्रतिनिधी
औरंगाबाद : शहानूरमियाँ दर्गा परिसरातील ईझी डे या मॉलमध्ये गोंधळ घातल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेश शैलेंद्र देहाडे व त्यांच्या तीन कार्यकत्र्यांनी गोंधळ घातल्याची तक्रार मॉलचे सहव्यवस्थापकांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी श्री. देहाडे यांच्याशी औरंगाबाद न्यूज लाइव्हने संपर्क साधला असता
त्यांनी सांगितले, की आमचे कार्यकर्ते केवळ धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अन्नदान मागायला गेले होते. त्यावर मॉलच्या व्यवस्थापकाने त्यांना अरेरावी केली. त्यानंतरही कार्यकत्र्यांनी शांततेने घेत तिथून निघून आले. मात्र त्यानंतर व्यवस्थापकाने आमच्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार केली, असेही ते म्हणाले.
तक्रारीत म्हटले आहे, की देहाडे व त्यांच्या ३ कार्यकत्र्यांनी धार्मिक कार्यक्रमासाठी ईझी डे मॉलचे सहव्यवस्थापक सतीश सुरेश बघेल यांच्याकडे साखर, तांदूळ, दाळ (प्रत्येकी एक क्विंटल), तुपाचा डबा आदी किराणा मोफत द्या, अशी मागणी केली. त्यावर बघेल यांनी नकार दिला. त्यामुळे कार्यकत्र्यांनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच मॉलची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर मॉलमधील धान्यात किडे, दगड टाकून मॉलची बदनामी, जातीयवादाची केस करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.