प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद-नगर हायवेवरील सिडकोमहानगर चौकात कंटेनर आणि दुचाकीत झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले. सोमवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी, की नगरहून औरंगाबादकडे येणारा कंटेनर सिडको महानगरकडे वळण घेत असताना विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी (करिज्मा) कंटनेरवर धडकली. यात विकी मोहन कासुरे (वय २६), सुनील देविचंद कणसे (वय २४) हे दोघे जागीच ठार झाले तर राम विठ्ठल नलावडे (वय २५, रा. सर्व तिसगाव) हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नवले, रमेश सांगळे, शेख सलीम आदींनी घटनास्थळी धाव घेतली व सर्वांना घाटी रुग्णालयात नेले. दरम्यान, उपचार सुरू असताना राम नलावडेचाही मृत्यू झाला.