प्रतिनिधी
औरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारघ्या विरोधात येत्या ३१ ऑक्टोबर रोजी भाजपच्या वतीने मराठवाडा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या नाटकामुळे ही जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यामागे काही अन्य काही कारण तर नाही ना, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
काँग्रस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भ्रष्टाचार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. त्याचबरोबर दुसकरीकडे वाढती महागाई,दरवाढीने सर्वसामान्य लोक हैराण झालेले आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या वतीने येत्या ३१ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून या सभेची तयारी करण्यात येत होती. दरम्यान, या मैदानावर या मैदानावर सुरू असलेल्या शंभू राजे ङ्मा नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. ते ३० ऑक्टोबरला संपणार असल्याने ३१ ऑक्टोबरला सभा निश्चित करण्यात आली होती. मात्र लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या नाटकाचे आणखी काही दिवस प्रयोग करण्यात येणार आहेत. जाहीर सभेची तयारी पूर्ण झालेली असली तरी मैदान उपलब्ध नसल्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली असल्याचे कारण भाजपच्या वतीने देण्यात येत आहे. तथापि ते फारसे पटण्यासारखे नाही. शहरात अन्य अनेक मैदानेही उपलब्ध आहेत. त्यापैकी एखाद्या मैदानावरही ही सभा घेता आली असती. त्यामुळे यामागे अन्य काही
कारण तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.