प्रतिनिधी
औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील वीज वितरणाचे काम १ मे २०१० पासून जीटीएल या खासगी कंपनीकडे देण्यात आलेले आहे. जीटीएलच्या कार्यपद्धतीबद्दल वीज ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष असून, अनेक तक्रारी आहेत. मात्र या तक्रारींची दखल घेतली जात नाही आणि तक्रारींचे निवारणही होत नसल्याने वीज ग्राहकांकरिता कार्यरत संस्था उर्जा मंचच्या वतीने शहरातील विविध भागांत
ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आल्याची माहिती उर्जा मंचचे अध्यक्ष विनोद नांदापूरकर यांनी दिली आहे.
या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महावितरण आणि वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत ग्राहकांना सेवा उपलब्ध करुन देणे जीटीएल कंपनीकडून अपेक्षित होते. एकीकडे वीज सेवा उपलब्ध करुन देताना जीटीएल कंपनीततर्फे अनेक नवीन नियम आणि वीज कायद्यात तरतूद नसलेल्या चुकीच्या अटी ग्राहकांवर लादण्यात येत आहेत. तर दुसरीकडे ग्राहक सेवेबाबत जीटीएल पूर्णपणे उदासीन असल्याने जीटीएलच्या गेल्या १७ महिन्यांतील कारभारावरुन निदर्शनास आले आहे. जीटीएलततर्फे शहरातील दोन लाख ग्राहकांकरिता निराला बाजार आणि एन-४, सिडको अशी दोन वीज ग्राहक सेवा केंद्रे सुरु करण्यात आलेली आहेत. या केंद्रांवर तक्रार निवारण करण्याऐवजी ङ्कक्त तङ्मारी स्वीकारण्याचे काम होताना दिसते. एखाद्या ग्राहकाने त्रस्त होऊन महावितरणच्या वीज ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केल्यास संबंधित ग्राहकाने जीटीएलच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षात ती दाखल केलेली नसल्याने खारीज करण्याची मागणी मंचात सुनावणीच्या वेळी केली जाते. उर्जा मंचतर्फे या बाबतीत जीटीएलच्या वरिष्ठ अधिकाèयांबरोबर चर्चा करुन समन्वयाने हे प्रश्न सोडविण्याकरिता अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले, पण प्रत्यक्ष कृती न करता तोंडी ओशासन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे उर्जा मंचतर्फे शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्याकरिता खालील ठिकाणी वीज ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येत आहेत. वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारी दोन प्रतींत आणून दिल्यास त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न उर्जा मंचतर्फे करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्याकरिता महावितरणच्या माजी कर्मचाèयांनीही योगदान देण्याची विनंती या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारींकरिता पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा - प्रसाद कोकीळ (९१५८८९८०७६), एमआयडीसी, वाळूज, श्री. शेरखान पठाण (९४२२२०२८१३), टाऊन हॉलजवळ, महापालिकेजवळ, जयेश शहा (९८२२६५४०८७), रोकडिया हनुमान कॉलनी, जयंत मुळे (९४२३७७७८७५), विेशभारती कॉलनी, शरद चोबे (९४२३०२८३३२), चेतनानगर, हेमंत कापडिया (९४२२२०५४४१), २५, शांतीनिकेतन कॉलनी.