विवाहित पुरूषांकरिता शास्त्रज्ञांनी एक चांगला सल्ला दिला आहे. जर आपल्यासमोर एखादा मोठा पेच निर्माण झाला असेल आणि निर्णय घेणे कठीण जात असेल तर उगीच डोके खाजवत बसून तणाव वाढवून घेऊ नका. थेट पत्नीची मदत घ्या. संशोधकांचे मानने आहे की अशा परिस्थितीत पुरूष गोंधळून जाऊन चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते तर महिला बिकट परिस्थितीत विचार करून निर्णय घेतात. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी पुरूषांच्या निर्णय क्षमतेवर अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
अभ्यासात दिसून आले, की तणावाच्या क्षणांमध्ये पुरूष केवळ त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेत असतात, महिला मात्र दूरगामी विचार करून एखाद्या परिणामापर्यंत पोहचतात. निर्णय घेताना महिला आणि पुरूषांचा मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. प्रमुख संशोधक निकोल लाईटहॉल यांनी सांगितले, की निर्णय घेण्यात समजदारी दाखवणे आणि वेळ लावणे नेहमी चांगले असते. महिला असे करताना दिसतात, ज्याचे परिणाम नंतर योग्यच येतात. त्यामुळे पुरूषांनी तणावात पत्नीशी सल्लामसलत केली पाहिजेत. तणावमुक्त झाल्यानंतर महिला आणि पुरूष एकसारखाच अनुभव घेतात, असेही लाईटहॉल म्हणाले. डेली मेल या ब्रिटिश वृत्तपत्रात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.