औरंगाबादेत मातंग समाज मेळावा
प्रतिनिधी
औरंगाबाद : आठ टक्के आरक्षणाच्या मागणीचे घोडे अडले याला कारण केवळ आणि केवळ लक्ष्मण ढोबळे असून, या स्वकियांतील शत्रूमुळेच आतापर्यंत मातंग समाजाला विकासापासून दूर राहावे लागले, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात मातंग समाज मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन श्री. खडसे यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलताना खासदार निधीतून मातंग समाजाच्या वसाहतीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. अॅड. दयानंद भांगे यांनीही भाषण केले. सामाजिक कार्यकत्र्या जयाताई कुंडल, सेवानिवृत्त तहसीलदार राधाकिसन खंदारे व एटीएसचे पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांना या वेळभ क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त गायिका पंचशीला भालेराव व भाऊसाहेब शेजूळ यांचाही सत्कार करण्यात आला.