बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजकाल सलमान खानच्या घरी जरा जास्तच दिसू लागली आहे. काहीच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तिची मर्सिडीज कार सलमानच्या घरासमोर उभी होती. बराच काळानंतर ती लूज पॅन्ट आणि स्पेगिटी टॉप घालून त्याच्या घरातून बाहेर पडली. त्यामुळे बॉलीवूडमध्ये वेगळ्या तर्कवितर्कांना पेव फुटले आहे. प्रियांका शाहरूखची मित्र मानली जाते, आणि सलमानचे शाहरूखशी फारसे पटत नाही. अशा स्थितीत प्रियांकाची सलमानशी घसीट वाढल्याने नक्की काय प्रकार आहे, हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. शाहरूखच्या ग्रुपमधून फुटून प्रियांका सलमान इतक्या जवळ गेली की, चक्क अध्र्या रात्री तिला सलमानच्या घरातून बाहेर पडायला वेळ मिळाला, याचे सर्वांना कौतुक आहे. सलमान खान आणि प्रियांकाने अनेक चित्रपट सोबत केले आहेत. गॉड तुस्सी ग्रेट हो, सलाम ए इश्क, मुझसे शादी करोगी आदी चित्रपटांत सलमान आणि प्रियांकाची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. पण त्यानंतर अचानक तिला शाहरूखचे वेड लागले आणि त्याने शाहरुखसोबत चित्रपट करायला सुरुवात केली. पण आता पुन्हा सलमानकडे परत आली आहे. सलमान आणि तिच्यात नक्की कसे संबंध आहेत, याबाबतही बॉलीवूडमध्ये चर्चा होऊ लागली आहे. कारण प्रियांकाला भेटायलाच जायचे होते तर सकाळी qकवा दुपारी भेटायला जाऊ शकली असती. पण चक्क रात्री जायचे आणि मध्यरात्र उलटल्यानंतर त्याच्या बंगल्याच्या बाहेर पडायचे, यावरून दाल मे कुछ काला है, असं सर्व जण म्हणाहेत. बिच्चाèया कॅटरिनाला जेव्हा ही बातमी कळली असेल तेव्हा तिच्या हृदयाचे किती तुकडे झाले असतील, याचा विचारही करवत नाही. असो, सल्लू नक्की कुणाचा (सॉरी कुणाकुणाचा!) हे आगामी काळच ठरवेल, पण शाहरूखला प्रियांका आणि सलमानची मैत्री खटकू नये म्हणजे मिळवलं....