पुरूषांना स्वतःतील पौरूषत्व वाढविण्यासाठी आता डॉक्टरांचे उंबरठे झिजवण्याची गरज संपली आहे. संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने दावा केला आहे, की सनबाथमधून मिळणाèया व्हिटॅमिन डीमधून शुक्राणूची गुणवत्ता वाढते. त्यामुळे पितृत्वाचे सुख मिळवायचे असेल तर रोज सनबाथ घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रमुख संशोधनकर्ता मार्टिन ब्लूमबर्ग यांनी सांगितले, की ३४० पुरूषांवर केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोवळ्या उन्हात बसल्यानंतर त्यांच्या शरीरात निर्माण होणारे व्हिटॅमिन डी शुक्राणूच्या गुणवत्तेवर कसे परिणाम करते, याचा अभ्यास आम्ही केला. आम्हाला दिसून आले की, सनबाथमुळे केवळ गुणवत्ताच नाही तर शुक्राणू अधिक गतीने वाढतात आणि सक्रीय होतात. महिलांच्या तुलनेत पुरूषांकरिता सनबाथ घेणे गरजेचे आहे. रोज सकाळी त्यांनी काही काळ तरी उन्हात बसावे.
Home »
» पौरूषत्व वाढविण्यासाठी बसा उन्हात
