आपण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत असाल आणि एखाद्या कारणास्तव डाएqटग मध्येच सोडावे लागत असेल... तर सावध व्हा! कारण डाएटिंगची सवय शरीराला पडल्याने आपले वजन झपाट्याने वाढू शकते. ब्रिटनमध्ये २३०० लोकांच्या केलेल्या सर्वेतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
स्लिमग वल्र्ड या संस्थेने हे सर्वेक्षण केले. त्यातून त्यांनी निष्कर्ष काढला की, डाएटिंगसोडल्यानंतर झपाट्याने वाढणारे वजन व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी बनवते. व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. स्लिमग वल्र्डचे प्रमुख जॅकी लेविन यांनी सांगितले, अनेक जण वजन कमी करण्यासाठी डाएटिंगचा आधार घेत असतात. यात महिलांचे प्रमाण जास्त असते. डाएटिंगची सवय हळूहळू शरीर करून घेते आणि जेवढे अन्न पोटात गेले आहे, तेवढ्यावरच ते शरीराची दैनंदिन क्रिया चालवत असते. पण मध्येच डाएटिंगग बंद केल्याने शरीर हे बदल लवकर स्वीकारत नाही.डाएटिंग बंद केल्याने अचानक प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज मिळू लागतात. त्यामुळे मांसपेशी वाढीस लागून शरीर अधिक लठ्ठ बनत जाते. डाएटिंग करताना उगीच उपाशी राहून शरीरावर अन्याय केल्यापेक्षा कमी कॅलरीजचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. ते भूकही शांत करतात आणि वजनही वाढवत नाहीत. शिवाय डाएटिंग मध्येच बंद झाली तरी त्याचा फारसा परिणाम शरीरावर होत नाही, असेही जॅकी लेविन यांनी सांगितले.