युवा सेनेचा द्वितीय वर्धापन दिन
औरंगाबाद : २०१४ ची विधानसभा जिंकणे हे आपले ध्येय समोर ठेवून काम करा. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत झालाच पाहिजे. युवाशक्ती सत्तेत आणायची आहे. त्यासाठी प्रत्येक युवकाने युवा सैनिक म्हणून काम करा, अशी साद युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत घातली आणि त्याला हजारो युवकांनी प्रतिसादही दिला.
युवा सेनेचा द्वितीय वर्धापनदिन जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह सिडको येथे झाला. कुणाल रेगे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर महापौर अनिता घोडेले, खा.चंद्रकांत खैरे, खा. भावना गवळी, आ. विनोद घोसाळकर, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. किशनचंद तनवाणी, आ. संतोष सांबरे, संपर्कप्रमुख नेरूरकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, संतोष माने, ऋषिकेश खैरे, किरण तुपे, गायक अभिजित सावंत आदींची उपस्थिती होती. युवा सेना कसे काम करणार, काय काम करणार हे सर्व पदाधिकाèयांना माहिती आहे. सर्व उपक्रमांमध्ये युवा सेना आघाडीवर असली पाहिजे. मात्र हे करताना एकमेकांना पाडू नका. खांद्यावर पाय ठेवून मोठे व्हा; मात्र एकमेकांचे पाय ओढू नका. गटबाजीची लागण होऊ नये, अशी सूचनाही आदित्य ठाकरे यांनी या वेळी केली. या वेळी आ. सुभाष देसाई, युवा सेना केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे, अमोल कीर्तीकर, डॉ. राहुल पाटील, मिलिंद कांबळे यांचीही भाषणे झाली.