औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या नावावरून आज १८ रोजी मनपा सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. रस्त्याला डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचा आहे. राष्ट्रवादी, माक्र्सवादी कम्युनिस्ट पार्टीने डॉ. भापकर यांचे नाव त्या रस्त्याला देण्यास विरोध केला आहे, तर भाजपाची भूमिका आड ना विहिर अशी आहे.
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे २१ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन होणार आहे. महापौर अनिता घोडेले यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे सत्ताधाèयांनी त्या रस्त्याचे भूमिपूजन तातडीने करण्याचे ठरविले आहे. सर्वसाधारण सभेत ऐनवेळी ठेवण्यात येणाèया त्या प्रस्तावाचे रुपांतर ठरावात होण्याची शक्यता असून, त्याला विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख यांनी त्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदन गेल्या आठवड्यात दिले आहे, तर माकपाने महापौरांना निवेदन देऊन त्या रस्त्याला स्व. गोविंदभाई श्रॉफ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्या रस्त्याला परिवर्तन मार्ग असे नाव देण्याची मागणी अपक्ष नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी केली आहे.