प्रतिनिधी
औरंगाबाद : भाजपने राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात सर्वंकष संघर्ष अभियान सुरू केले असून, या अभियानाचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाèया सभेच्या पूर्वतयारीसाठी मराठवाड्यातील सर्वच पदाधिकाèयांनी कंबर कसल्याचे पूर्वतयारीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत दिसून आले. या बैठकीला खा. रावसाहेब दानवे, माजी आमदार श्रीकांत जोशी, प्रदेश सरचिटणीस अतुल सावे, उपमहापौर प्रशांत देसरडा, डॉ.भागवत कराड, प्रा.ज्ञानोबा मुंडे, रेखा पाटील आदी उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी मराठवाडाभर बैठका सुरू आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. औरंगाबादला ३१ ऑक्टोबरला होणाèया सभेत गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी मार्गदर्शन करणार आहेत. मुंडे यांच्यावर पक्षाने लोकसभेच्या १० मतदारसंघांची जबाबदारी टाकली आहे. शिवाय २०१४ च्या विधानसभेची त्यांच्यावरच जबाबदारी आहे. त्यामुळे मुंडे चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या अभियानात देश व राज्यातील भ्रष्टाचार, महागाईचे मुद्दे भाजपा जनतेसमोर मांडणार आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे.