मराठवाडा जनता विकास परिषदेची धरणे
प्रतिनिधी
औरंगाबाद : जायकवाडीत वरील धरणांतून पाणी सोडण्याची मागणीला घेऊन जनमताचा रेटा वाढू लागला आहे. जायकवाडीत ३५ टीएमसी पाणी सोडावे, यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरली.
एस.एम. पंडित, प्रा. डॉ. विजय पाथ्रीकर, गोपीनाथ वाघ, बन्सीलाल कुमावत, अॅड. प्रताप सोमवंशी, अॅड. जे.के. भालेराव आदींसह शेकडो कार्यकर्ते नागरिकांनी भाग घेतलेल्या या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी बोलताना अॅड. प्रदीप देशमुख म्हणाले, की १९९४ ते २०१० या कालावधीतील मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधी द्यावा, कोयना नदी खोèयातील मराठवाड्याच्या वाट्याचे २६ टीएमसी पाणी सोडावे, जायकवाडीखालील शेती व सिंचनाला पाणी मिळेल. याची व्यवस्था करावी आदी मागण्या त्यांनी केल्य. निळवंडे धरणातून सोडण्यात येणारे अडीच टीएमसी पाणी अत्यंत कमी आहे. हा जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे, अशा संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.