प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कुलगुरूंना निवेदन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणारी पेट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. पेट परीक्षा ऐन दिवाळीच्या सुट्यांत होत असल्याने आणि याच दिवशी भारत सरकारच्या सीटीईटीचेही पेपर असल्याने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनविसेने केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राज वानखेडे, अमोल खडसे, किशोर साबळे, तुषार पाखरे, अमोल पगारे, सुनील निकम, अनिकेत निलावार, जाकेर पटेल, रामेश्वर वरसील, सुभाष निकम, कलीम पटेल आदींच्या सह्या आहेत.