आपल्या खात्यात केवळ एक चित्रपट घेऊन बसलेल्या नर्गिसला आता वेगळेच वेध लागले आहेत. रॉकस्टार चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाèया नर्गिसला खरा मित्र हवा आहे. काही दिवसांपूर्वी शाहिदने नर्गिसला त्याच्या पार्टीत आमंत्रित केले होते. आपल्याला कुणी मित्र नसल्याने पार्टीत गेल्यानंतर तरी कुणाशी चांगली मैत्री होईल, असे वाटल्याने पार्टीत गेले होते, असे नर्गिस म्हणाली. मी प्रत्येक क्षणी चांगला मित्र कसा प्राप्त करता येईल याबाबत विचार करत असते. विमानतळावर असो की, विमानात मी जिकडे तिकडे जाते तिथे चांगला मित्र शोधते. रॉकस्टारच्या शूqटगदरम्यान माझी रणबीर कपूरशी ओळख झाली होती. आम्ही दोघांनी एकमेकांना चांगले समजूनही घेतले होते. पण लोक लगेच आमच्या नात्याविषयी वेगळाच संशय घेऊ लागले. त्यामुळे आमच्या चांगल्या मैत्रीत मीठाचा खडा पडला आणि मैत्री तुटली. आता मला पुन्हा एक चांगला मित्र शोधावा लागत आहे. मला कुणाशीही प्रेमसंबंध जोडण्यात अजिबात स्वारस्य नाही. मला qसगल राहावेसे वाटते. मित्र मिळत असतील तर मात्र मी कितीही स्वीकारायला तयार आहे, असे नर्गिस म्हणाली.