संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील, वर्षभरात काम फत्ते केले जाणार : खासदार खैरे यांची माहिती
प्रतिनिधी
औरंगाबाद : अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नगरनाका ते गोलवाडी या रस्त्याच्या चौपदरीकरणास संरक्षण मंत्रालयाने अखेर हिरवा कंदील दाखवला असून, वर्षभरात या रस्त्याचे कामही पूर्ण होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तीन किलोमीटरचा हा रस्ता आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रपरिषद घेऊन दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाईल. त्यासाठी सुमारे २१ एकर जागा देण्यासही संरक्षण विभागाने तयारी दाखवली आहे. संसदीय समितीनेही रस्त्याला मंजुरी दिल्याची माहिती खासदार खैरे यांनी दिली. वर्षभरात हा रस्ता पूर्ण करणे मोठे जिकरीचे काम असून, जो कंत्राटदार मिळणे वास्तविक अवघड आहे. हे आव्हान आता कोणता कंत्राटदार पेलतो हे महत्त्वाचे आहडे, असे ते म्हणाले. आमदार संजय शिरसाट, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक पक्षाच्या नेत्यांनी या प्रश्नी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. त्यांच्या आंदोलनाला हे यशच मिळाले असे म्हणावे लागेल.