प्रतिनिधी
आखाडा बाळापूर (हिंगोली) : आखाडा बाळापूर बसस्थानकाजवळ ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज, शुक्रवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.
सारंग कोकारे (रा. बवूर, ता. कळमनुरी) असे मृतकाचे नाव आहे. ट्रॅक्टर (एमएच ३८, बी १२७०) हा बांधकामाचे साहित्य घेऊन जात असताना हा अपघात घडला. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॉली उलटली. घटना घडताच नागरिकांनी धाव घेऊन जखमींना नांदेडला हलवले.