Home » » बिनधास्त ब्राइट

बिनधास्त ब्राइट

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २४ मे, २०१३ | ९:३९ AM


आपली स्टाइल आपण बनवायला हवी. मग उन्हाळ्यात कॉटनचे कपडे, पेस्टल शेड अशी बंधनं कशाला? बिनधास्त वापरा ब्राइट कलर्स आणि आपल्याला हवे ते कपडे.
उन्हाळा म्हटलं की सुती कपडे.. त्याची इस्त्री कशी कडक असायला हवी. ते खूप चुरगळतात. त्यामुळे संध्याकाळपर्यंत त्याचा अवतार होतो. उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून गडद रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग तर अजिबात नको. डोळ्यात खुपतील असे ब्राइट कलर्स तर अजिबात वापरू  नका. अशा अनेक सल्ल्यांनी आपणही कनफ्यूज होतो. पांढरे कपडे किंवा पेस्टल शेड वापरा, कॉटनचा आग्रह असे सगळे टड्ढेण्ड आता मागे पडलेत. पांढरे सुती कपडे घालण्यासाठी उन्हाळाच चांगला असं आपल्यालाही वाटत असतं. आपल्या वार्डरोबमधले पांढरे कपडे घालण्यासाठी पावसाळा काही उपयोगाचा नस
तो आपल्याकडे थंडी अशी पडत नाही मग ते कपडे समरटाइम वेअर म्हणून वापरले जातात. पण असं करण्याची फारशी गरज नाही. म्हणून मग पांढरे कपडे हे उन्हाळ्यात घालायला हवेतच, असंही काहीसं असावं. पण आपण काही असं करायची गरज नाही. उन्हाळ्यातच ब्राइट कलर्स घालायला हवेत ना?  फॅशन गुरुंचं ऐकून फॅशन करणाèयांपैकी आपण नाही आहोत. त्यामुळे बिनधास्त ब्राइट कलर्स वापरायला हरकत नाही. काळे कपडे घालू नका, कारण उन्हात अशा कपड्यांनी त्रास होतो. पण असं काही करायची गरज नाही. काळ्या कपड्यांवर चक्क चटकदार, फ्लोरल डिझायन्सचे कपडे या उन्हाळ्यात हायलाइट ठरू शकेल. जांभळे, निळे, पिवळे आणि चक्क ब्राइट आँरेजमधे नवे कपडे शिवा काहीच हरकत नाही. चुडीदार तर ऑल टाइम हिट.. वेस्टर्नवेअर्समधे ब्लॅक तर हॉट फेवरिट पण चॉकलेट ब्राउन, मरून असे कलर या उन्हाळ्यात तुम्ही निवडा. पाहा तुमच्या डोळ्यांना त्रास होणार, असं कोणी म्हटलं तर त्याला गॉगल घालण्याचा सल्ला द्या.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.