Home » » नेल्स आर ब्युटिफूल

नेल्स आर ब्युटिफूल

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २४ मे, २०१३ | ९:३७ AM


पर्सनॅलिटी खुलवण्यासाठी नेलआर्टची सध्या खूप क्रेझ आहे. फक्त केस, डोळे, हाइट, रंग यावरून मिळणारी कॉम्प्लिमेण्ट आता नखांच्या सौंदर्यावरूनही मिळू शकते.
पर्सनॅलिटी खुलवण्यासाठी, चारचौघींमध्ये छाप पाडण्यासाठी आपण काय काय करतो? मेकअप, हटके हेअरस्टाइल, आऊटफिट्स, शूज, अ‍ॅक्सेसरीज वैगेरे वैगेरे... ग्रुपमध्ये अटायर युनिक असावा, यासाठी तर किती दुकानं, फॅशन स्टड्ढीट पालथी घालतो हे आपणचं जाणो. आणखी एक फॅशन स्टेटमेण्ट आपली ओळख बनू शकतं. ते म्हणजे, नेलआर्ट. तीच ती जिचे सिल्की केस आहेत, ऑसम डोळे आहेत... अशी ओळख आता सुंदर नखांमधूनही निर्माण होऊ शकते.
केवळ नेलपेण्ट लावून नखं स्टायलिश करण्यापलीकडची फॅशन म्हणजे नेलआर्ट. नखांवर अ‍ॅकॅ्रलिक कलर्स, स्टीकर्स, ग्लिटर्स, ज्वेल्स, हॅण्ड पेण्टेड डिझाईन करून ती आकर्षक बनवता येतात. ही फॅशन करण्यासाठी ‘हानगरांत खास नेलआर्ट पार्लर्स ओपन झाले आहेत, यावरून हा टड्ढेण्ड किती लोकप्रिय आणि लेटेस्ट आहे, याचा अंदाज येतो. स्पेशल ओकेजनला हेअर स्टाइल, डड्ढेसअप, मेकअप करण्याबरोबरच नेलआर्ट टड्ढाय केलं तर कॉम्प्लिमेण्ट मिळालीच म्हणून समजा. नखं लांबीने आणि रूंदीने जेवढी मोठी तेवढा नेलआर्ट करायला कॅनव्हास मिळतो. यामुळे पाहिजे तशी डिझाईन्स आणि कलर्स वापरता येतात.
टेम्पररी, जेल नेल्स आणि अ‍ॅक्रॅलिक हे नेलआर्ट्चे फेमस प्रकार. टेम्पररी नेलआर्टमध्ये पाहिजे त्या आकारात आणि रंगात तात्पुरत्या स्वरूपाचे नेल्स वापरले जातात. ते रिमुएबेल असतात. सगळ्यात वापरला जाणारा प्रकार म्हणजे जेलनेल्स. या प्रकारात नखांवर आर्टिफिशल आर्ट असली तरी, ती रिअल वाटतात. पातळ किंवा लवकर तुटणारी नखं असतील तर, त्यावर जेलआर्ट टड्ढाय केलं जातं. अ‍ॅक्रॅलिक कलर्स वापरून पाहिजे तशी नाजूक डिझाइन्स नखांवर सुंदर दिसतात. मल्टिकलर्स वापरून ही आर्ट अधिक आकर्षक करता येते. गोल्डन आणि सिल्ह्वर ग्लिटर्स वापरूनही नाजूक नक्षीकाम करता येतं.  नेलब्रश आणि नेलपेण्ट ट्यूब वापरूनही नखांवर युनिक डिझाइन्स करता येतात. नेलआर्टचं सगळं साहित्य ब्युटीशॉपमध्ये अवेलेबल असतं. फ्रेंच मॅन्युक्युअरचंही सध्या फॅड आहे. यामध्ये फक्त नखांना व्हाइट कलर आणि नखांखालची स्कीन ओरिजनल दिसावी म्हणून पिंकीश कलर दिला जातो. नखं सिंपल आणि सोबर दिसण्यासाठी हा प्रकारही तरूणींमध्ये फॉर्मला आहे. ऋतूनुसार आर्ट कलरमध्ये विविधता आणता येते. हिवाळा आणि उन्हाळ्यात फ्रेश फेण्ट कलर्स, पावसाळ्यात डार्क शेड्स नखांना फ्रेश लूक आणतात. नखांच्या ग्रोथवर आर्ट किती दिवस टिकून राहणार हे अबलंबून असतं. लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे, कलर्स रिमूव्ह करण्यासाठी कम्प्लसरी रिमुव्हरचाच वापर करावा. अ‍ॅसिटोन वापरल्यास नखांवर अ‍ॅसिडचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. सिझनल नेटआर्ट वापरणं जास्त योग्य. कारण यामध्ये स्टीकर्स, ज्वेल आयटम्स चिकटवण्यासाठी नेलग्लूचा वापर होतो. हे एक प्रकारचं फेव्हिस्टिक असल्याने यामुळे नखं खडबडीत होतात आणि त्याचा नॅचलर कलरही हळूहळू जातो. इतकी आकर्षक नेलआर्ट वापरणंही सोप आहे. लग्न किंवा एखादा स्पेशल ओकेजन असेल तर, इतर मेकअपबरोबर नेलआर्टचा पर्यायही आहेच. सो, टड्ढाय इट. यामुळे नखंही ब्युटीफुल लूक येईल.


Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.