योगयागविधी येणे नोहे सिद्धी ।वायाची उपाधी दंभ धर्म ॥ १ ॥
भावेविण देव न कळे नि:संदेह ।गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।गुजेविण हित कोण सांगे ॥ ३ ॥
विवेकानंद नगर मो.९८८१८२६२५८
भावेविण देव न कळे नि:संदेह ।गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।गुजेविण हित कोण सांगे ॥ ३ ॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।साधूचे संगती तरणोपाय ॥ ४ ॥
ज्ञानेश्वर माऊली ही खÚया अर्थाने जनसमुदायाचे
हितचिंतक आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्तीभाव जागृत होण्याच्या दृष्टीने सदैव
उपदेश देतात.योगयागविधी यांच्या योगाने सर्वांना सिध्दी सहज प्राप्त होईलच असे
नाही. म्हणून या हे सर्व दंभरूप आहेत,म्हणून व्यर्थ उपाधि होत. साधकाला जोपर्यंत श्रीहरीची सत्ता
कळल्यावाचून श्रीहरीची प्राप्ती नाही व संशयाची निवृत्ती देखील होत नाही.
सदगुरूवाचून अनुभव कसा येईल,कारण
तप केल्याशिवाय ज्याप्रमाणे देव प्रसन्न होत नाही. धनादिकांचे अर्पण केल्याशिवाय
प्रत्येकाला जसे दानाचे फळ मिळत नाही,तसेच निःसम प्रेमाशिवाय गुज म्हणजेच एकांतात सांगितले जाणारे
गुहय ज्ञान कोणी सांगत नाही व गुहयावाचून हित नाही.ज्ञानेश्वर माऊली साधकाला
सांगतात की, साधूच्या संगतीवाचून तरणोपाय नाही. प्रत्येकाने साधूच्या संगतीत
सदैव रममान व्हावे असा मौलीक संदेश देतात.
संतोषबापू थोरहाते,विवेकानंद नगर मो.९८८१८२६२५८