Home » , , » औरंगाबादेत मतिमंद मुलीवर बलात्कार

औरंगाबादेत मतिमंद मुलीवर बलात्कार

Written By Aurangabadlive on गुरुवार, २७ डिसेंबर, २०१२ | १२:४१ PM


नराधम आरोपी परिवहन महामंडळाचा सेवानिवृत्त कर्मचारी

प्रतिनिधी/२८ डिसेंबर
औरंगाबाद : देशाच्या राजधानीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन देशात संतापाची लाट उसळली असताना औरंगाबादेतील फुलेनगरमध्ये एका २० वर्षीय मतिमंद मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी हा परिवहन महामंडळाचा सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यास अटक करून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मन नाथाजी बनकर (६५, रा. फुलेनगर) असे या नराधमाचे नाव आहे.  दि. २५ रोजी तो घरच्या मंडळीसोबत लग्नासाठी बाहेर गेला होता. मात्र काही काम काढत तो परत घरी आला. त्याचवेळी जवळच राहणाèया मतिमंद मुलीच्या घरातील मंडळीही लग्नानिमित्त बाहेरी गेलेली होती. ही संधी साधून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लक्ष्मन बनकर या नराधमाने सदरील मुलीच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारी राहणाèया एका महिलेच्या लक्षात येताच तीने मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. त्यावरून घरच्यांनी तत्काळ घरी धाव घेत पीडीत मुलीस घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात मुलगी आणि आरोपी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलीचा भाऊ विनोद कडूबा पट्टेकर (३६, रा. फुलेनगर) यांच्या फिर्यादीवरुन सदरील आरोपीविरुद्ध ३७६, ४४८, ३५४, ५११ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. टी. पाटील करीत आहेत.दोन दिवसांपूर्वीच बीड शहराजवळ एका मतिमंद मुलीवर बाप-लेकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा औरंगाबादेत असाच प्रकार घडल्याने दोन्ही प्रकरणातील आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी होत आहे.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.