प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरात तीन दुकानांवर अचानक छापे घालून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने आज २६ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
गुटखा विक्री व उत्पादनावर बंदी असताना गुटखा विक्री होत असल्याची माहिती खबèयामार्फत अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सी.डी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जाफरगेट परिसरातील धर्मवीर प्रोव्हिजन येथे धाड टाकून २,८६० रुपयांचा गोवा, १,१२५ रुपयांचा हिरा व ३०० रुपयांचा पान पराग असा ४,३०५ रुपयांचा गुटखा जप्त केला. यानंतर याच परिसरातील टीव्हीएस प्रोव्हिजनमधून २,७०० रुपयांचा हिरा, ३,०६० रुपयांचा गोवा जप्त केला. एकूण ५,७९७ रुपयांचा गुटखा जप्त केला व ओम वासूमल प्रोव्हिजन येथून ८,२१२ रुपयांचा हिरा, २,१६० रुपयांचा गोवा, आरएमडी १,८०० रुपये व ३,००० रुपयांचा सितार व ६०० रुपयांचा पान पराग असा १५,७७२ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. शहरात असेच धाडसत्र सुरू राहणार असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली.