Home » , , » एसबीआयचे एटीएम फोडून १२ लाख लंपास

एसबीआयचे एटीएम फोडून १२ लाख लंपास

Written By Aurangabadlive on गुरुवार, २७ डिसेंबर, २०१२ | १२:३८ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून १२ लाख २८ हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास फुलंब्री येथे घडली.
फुलंब्री - सिल्लोड मार्गावर गाडेकर हॉस्पिटल शेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेच्या तळमजल्यावर या बँकेचे एटीएम आहे. रात्री ८ वाजेच्या नंतर या रस्त्यावर फारशी ये - जा करणाèयांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असते.  तसेच बहुतांश रात्रीच्या वेळा हे एटीएम रूम बंद असते. यामुळे एटीएम रूमच्या शटरला कुलूप लावून कर्र्मचारी निघून जातात. मंगळवारी रात्री चोरट्यांनी  प्रथम एटीएम रूमच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शटर लावून आत एटीएम मशिनचा दरवाजा कापून काढला व एटीएम मधील चार रकान्यातील १२ लाख २८ हजार ३०० रुपये घेऊन पसार झाले. बँकेच्या वरच्या मजल्यावर इमारत मालक व भाडेकरू राहतात मात्र या कोणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. या ठिकाणी एटीएम सुरू होऊन दोन वर्ष झाले. यानंतर अनेक ठिकाणी एटीएम फोडल्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच याच बँकेचे बदनापूर येथील एटीएम फोडून १७ लाख रूपये पळविले आहेत. असे असतानाही बँकेनी आपल्या एटीएम रुमसाठी सुरक्षा रक्षक ठेवला नाही. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेला नाही. येथील बँक कर्मचाèयांनी याबाबत मुख्य कार्यालयास वारंवार कळविले. मात्र मुख्य कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक प्रविण गोटूरकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलिस  निरीक्षक एस.डी.पवार करीत आहेत.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.