प्रतिनिधी
औरंगाबाद : एका भाजलेल्या २२ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.
सगुनाबाई विठ्ठल राठोड (२२, रा. वाघोडा तांडा, ता. मंठा) ही महिला ६ डिसेंबर रोजी सांयकाळी सात वाजता घरामध्ये भाजलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी जालना येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सदरील महिलेची मंगळवारी सायंकाळी प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.