प्रतिनिधी
औरंगाबाद : मॉलमध्ये चोरी करणाèया दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीतील मुद्दोलही पोलिसांनी हस्तगत केला आहे. ८ डिसेंबर रोजी प्रोझॉन मॉल येथून चोरट्यांनी एक लॅपटाप, पेन ड्राईव्ह असा २८
हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला. यावरून पोलिसांनी सापळा लावला असता सुभाष बालाजी काकडे (रा. मिसारवाडी), मिस्त्री पंडीत सावंत (एन-२, मुकुंदवाडी) हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी तोंड उघडले व चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले आहे. या जोडीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.