Home » , , » टोळीतील तिसरा आरोपी इंदौर येथून अटक

टोळीतील तिसरा आरोपी इंदौर येथून अटक

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२ | ९:४२ AM

८५ हजाराचे सोन्याचे नाणे जप्त
प्रतिनिधी
औरंगाबाद : क्रेडीट कार्डची लिमीट वाढविण्याच्या नावाखाली डॉक्टरांसह व्यापाèयांना गंडविणाèया टोळीतील तिसèया आरोपीस पोलीसांनी इंदौर येथून अटक केली. त्याने खरेदी केलेले ८५ हजार ३६६ रुपयांचे सोन्याचे नाणेही हस्तगत केले आहेत. अटकेत असलेल्या आरोपींचा एक साथीदार दिल्लीत असून त्याच्या शोधात एक पथक रवाना झाले आहे.
के्रडीट कार्डची लिमिट वाढवून देतो, त्यासाठी आपले कार्ड, एक फोटो आणि पॅन कार्डची प्रत आमच्या माणसांकडे द्या, तुम्हाला नवीन कार्ड पाठविण्यात येईल, अशी बतावणी करुन शहरातील नामांकित डॉक्टरांसह व्यापाèयांना गंडविणाèया दोन उच्च शिक्षीत भामट्यांना सायबर सेलच्या पोलीसांनी दि. १६ रोजी इंदौर येथून मोहम्मद आशु मोहम्मद इक्बाल (२४, रा. ५१, जुना पेठा, बडेवाली इंदौर) आणि शबाज खान अन्वर खान (२४, रा. १७१/१ जुना पेठा बडेवाली इंदौर) या दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने २६ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तपासाची चक्रे फिरविण्यात आली. दोघा आरोपींना सोबत घेवून त्यांच्या तिसरा साथीदार इरफान कुरेशी इकबाल कुरेशी यास इंदौर येथून अटक केली. या आंतरराज्य टोळीतील आणखी एक आरोपी दिल्ली येथे असल्याच्या माहितीवरुन पोलीस निरीक्षक गौत्तम पातारे यांचे पथक त्याच्या शोधात रवाना झाले आहे. ही टोळी पकडण्यासाठी पोलीसानी मोठे प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील अनेक डॉक्टर, व्यापारी, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना काही दिवसांपूर्वी मी आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय, असे फोन आले. फोनवरुन तुमच्या क्रेडीट कार्डची लिमीट कंपनीकडून वाढविण्यात आली आहे. त्यासाठी उद्या तुमच्याकडे आमचा माणुस येईल त्याच्याकडे तुम्ही के्रडीट कार्ड तुकडे करुन द्या, सोबत एक फोटो, पॅन कार्डची झेरॉक्स द्यावी, त्यानंतर तुमची क्रेडीट लिमीट वाढविण्यात येवून तुम्हाला नवीन कार्ड आमच्या बँकेमार्फत देण्यात येईल. अशी थाप मारण्यात आली. जमा केलेल्या या के्रडीट कार्डच्या आधारे आरोपींनी लाखो रुपयांची खरेदी केली. या कार्डव्दारे खरेदी केल्याचा एसएमएस कार्डधारकांना येताच त्यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यानुसार सिटीचौक, क्रांतीचौक, उस्मानपुरा, जवाहरनगर येथे अज्ञात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव आणि सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गौत्तम पातारे यांनी तपासास सुरुवात करताच सदरील खरेदी ही इंदौर येथून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील यांच्या पथकाने इंदौर येथे धाव घेत खरेदी झालेल्या दुकानातून सीसीटीव्हीचे फुटेज मिळविले. त्या आधारे स्थानिक पोलीसाच्या मदतीने दोन आरोपीस अटक केली होती. आता तिसरा आरोपी पकडला असून लवकरच पुन्हा एक साथीदारास अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.